युथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक शिष्यवृत्ती कार्यक्रम

शिष्यवृत्ती कार्यक्रम

युथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक 

उच्च शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी

पेरनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन

शिष्यवृत्ती समर्थन कार्यक्रम जाहीर करीत आहे.

आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिष्यवृत्ती, करिअर मार्गदर्शन आणि जीवन कौशल्य द्वारे शिक्षणात सहाय्य करणे. हे युथ ड्रीमर्स फाउंडेशन चे मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी संस्था कार्य करीत आहे.

युथ ड्रीमर्स फाऊंडेशन ची स्थापना ही खेडा गुजरात येथे शिष्यवृत्ती कक्षाची संकल्पना राबविण्यात आली ती यशस्वीरित्या पूर्ण झाली या संकल्पनेतुन २०१५ साली ना-नफा तत्वानुसार संस्थेची स्थापना करण्यात आली. 

युथ ड्रीमर्स फाउंडेशन ही संस्था मुख्यतः सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास व ज्यांना शिक्षण घेण्यासाठी मदतीची गरज आहे अश्या घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन व समर्थन द्वारे पुढील शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल यासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी त्याना मार्गदर्शन, कागदपत्रे व पडताळणी तील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य संस्था करीत असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यात समस्या येत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित करून त्यांना विविध शिष्यवृत्ती योजना मध्ये त्यांचे आवेदन करण्याचे काम संस्था करते ज्यामुळे जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळतो व त्यांचे उच्च शिक्षणातील आर्थिक अडचण दूर होते.

सध्यस्थीतीत संस्था पटना, बिहार, दिल्ली, राजस्थान व महाराष्ट्र राज्यात यासाठी  सामाजिक कार्य करीत आहे. 

युथ ड्रीमर्स फाउंडेशन ही आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र यांची ज्ञान भागीदार संस्था म्हणून कार्य करीत आहे. आदिवासी  आश्रमशाळे तील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व मार्गदर्शन करण्याचे काम आदिवासी भागात करीत आहे.

आजपावेतो ५०००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली आहे. त्यापैकी ५५१० विद्यार्थ्यांना २ करोड रुपये शिष्यवृत्ती देण्यात संस्था यशस्वी झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ३० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालया तील जवळजवळ ८००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना शिष्यवृत्ती जनजागृती, मार्गदर्शन व आवेदन प्रक्रिये साठी युथ ड्रीमर्स फाउंडेशन ने मदत केली आहे

सदर शिष्यवृत्ती निशुल्क आहे व कुठलीही परीक्षा घेतली जात नाही.

विद्यार्थ्यांची परिस्थिती, गरज  व मेरिट नुसार शिष्यवृत्ती दिली जाते.  

नाशिक जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती समर्थन योजने द्वारे उच्च शिक्षणातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी परानोड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन दिंडोरी नाशिक यांच्या मदतीने युथ ड्रीमर्स फाउंडेशन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ही योजना दिंडोरी जिल्हा – नाशिक मध्ये राबवत आहे. 

तरी खालील नियम अटी पूर्ण करीत असलेले जास्तीत जास्त दिंडोरी, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजने साठी आवेदन करावे हे आवाहन युथ ड्रीमर्स फाउंडेशन च्या वतीने केले जात आहे.

1) सदर शिष्यवृत्ती योजना पदवी व पदव्युत्तर  सर्व शैक्षणिक व व्यवसायिक कोर्सेस साठी आहे (उदा. UG, PG, B.com, M.Com, B.sc, M.sc BA, MA, MBA, BBA, BAMS, MBBS, ITI, Diploma, Polytechnic etc)

2) उत्पन्न मर्यादा : अडीच लाख वार्षिक 

3) आवेदक नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असावा.

4) सर्व प्रवर्गातील विद्यार्थी आवेदन करू शकतात.

5) पहिल्या वर्षी पदवी शिक्षण घेत असलेल्या आवेदकला मागील वर्षी म्हणजे 12 वी ला 70% गुण असावे. जर तुम्ही दुसऱ्या किंव्हा 3 रया वर्षाला असाल तर मागील वर्गात पदवी पदव्युत्तर शिक्षणाला किमान 55% गुण असावे. ITI DIPLOMA साठी 10 वी  आणि 12 वीत 60% गुण असावे. ( आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यास व उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असल्यास गुण कमी असले तरी गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकतात)

6) SC, ST आणि Minority प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये 10% सवलत आहे.

7) मुलींना गुणांमध्ये 5% सवलत आहे.

8) दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणांमध्ये 20% सवलत आहे.

9) दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे दिंडोरी तील सर्वच विद्यार्थी आवेदन करू शकतात.

कागदपत्रे:- 

  • मागील वर्षीचे गुणपत्रिका
  • उत्पन्न दाखला (2018-19) तहसीलदार यांचे 
  • जात प्रमाणपत्र
  • एक पालक असल्यास त्या संबंधित पुरावा (उदा. मृत्यू दाखला)
  • आधार कार्ड किंवा कुठलेही शासकीय ओळखपत्र
  • पासपोर्ट फोटो

खालील लिंक वर क्लिक करा व गुगल फॉर्म भरून आवेदन करा.

तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या 7620720424 वॉट्सएप नंबर वर नाव,मोबाईल नंबर व सर्व  कागदपत्रे स्कॅन करून पाठवा।

अभी फॉर्म भरें

अधिक माहिती साठी संपर्क :

युथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक

5, रुंगठा इन्कलेव्ह गजानन महाराज मंदिर समोर, कमोद नगर , इंदिरा नगर, नाशिक 422009

संपर्क क्रमांक – 7620720424

Website: www.youthdreamersfoundation.org

Facebook: https://www.facebook.com/youthdreamersfoundation/

Linkedin:https://www.linkedin.com/company/youthdreamersfoundation/?viewAsMember=true 

मदतीसाठी संपर्क क्रमांक:

  • शिवराज विभूते 9881781804
  • रमन टेकाडे 9890700442
  • रामस्वरूप (धिरज) मंडल 9834945114
  • खुशाल सुथार 9768754319
जन्म से ही क्रिकेट का दीवाना हूँ लेकिन क्रिकेटर बन नहीं सका और अब विकिपीडियन बनकर खिलाड़ियों पर लिखना शौक बना दिया है।

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here